BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: विषय समितीत निवड होताच शिवसेना नगरसेविकेचा तडकाफडकी राजीनामा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीत नियुक्ती झालेल्या शिवसेनेच्या रेखा दर्शले यांनी निवड होताच तडकाफडकी राजीनामा दिला. आपण समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. दर्शले यांनी नाराजीतून राजीनामा दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु असून शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत आज (सोमवारी) नवीन सदस्यांची महासभेत निवड करण्यात आली.

  • शिवसेनेमध्ये खासदार श्रीरंग बारणे आणि महापालिका गटनेते राहुल कलाटे असे दोन गट आहेत. दोन्ही गटात सातत्याने धुसफूस होत असते. महापालिकेच्या विषय समित्यांमध्ये आज नवीन सदस्यांची निवड करताना त्याचा पुन्हा प्रत्यय आला. प्रत्येक समितीत सख्यांबळानुसार शिवसेनेच्या एका अशा चार नगरसेवकाची निवड झाली. सदस्य निवडीत बारणे गटाचे वर्चस्व दिसून येते. बारणे गटाचे प्रमोद कुटे, निलेश बारणे, अश्विनी चिंचवडे या तिघांची वेगवेगळ्या समितीत वर्णी लागली. तर, कलाटे यांच्या प्रभागातून निवडून आलेल्या रेखा दर्शले यांची शहर सुधारणा समितीत निवड झाली.

रेखा दर्शले यांची शहर सुधारणा समितीच्या सदस्यपदी निवड होताच तडकाफडकी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. निवड झाल्यानंतर दर्शले या महासभेत बोलयाला उभ्या राहिल्या. मी शहर सुधारणा समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. याबाबत दर्शले यांच्याशी संपर्क साधला असता ‘आपण मिटिंग’मध्ये असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ”विषय समितीत निवड करण्यात येणा-या सदस्यांची नावे पक्षाकडून आली आहेत. ती नावे आपण महापौरांकडे दिली. दर्शले यांनी राजीनामा का दिला? याबाबत आपल्याला सांगता येणार नाही”

.