Pimpri : शिवसेना खासदारांमध्ये अस्वस्थता ? आढळराव म्हणतात, ‘युती व्हावी ही मनापासून इच्छा!’

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करावी अशी शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासह पाच खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर इच्छा व्यक्त केली. युती नाही झाल्यास आम्ही निवडणूक लढविणार नसल्याची त्यांनी भूमिका घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. परंतु, खासदार आढळराव यांनी याचा इन्कार केला आहे. अशी कोणतीही चर्चा झाली नाही. आमच्या विरोधात कोणीतरी षडयंत्र करीत आहे. परंतु, युती व्हावी ही आमची मनापासून इच्छा आहे. तसेच आमच्यापेक्षा युतीची जास्त गरज भाजप खासदारांना आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत यापुढे सगळ्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुका शिवसेनेने स्वबळावरच लढविल्या आहेत. परंतु, आता लोकसभा निवडणुकीला शिवसेना खासदारांना भाजपसोबत युती व्हावी असे वाटत आहे. युती नाही झाल्यास निवडून येऊ की नाही, याची चिंता शिवसेना खासदारांना सतावत असल्याची चर्चा आहे.

त्यामुळेच शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह पाच खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर युतीची इच्छा व्यक्त केली आहे. युती नाही झाल्यास आम्ही निवडणूक लढविणार नसल्याची त्यांनी भूमिका घेतल्याची राजकीय वर्तुळात सुरु आहे. परंतु, खासदार आढळराव यांनी याचा इन्कार केला आहे.

याबाबत बोलताना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ”युती नाही झाल्यास आम्ही निवडणूक लढविणार नाही, असे कधीच म्हटले नाही. हे सर्व खोटे असून शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. शिवसेनेत अशी पद्धत नाही. शिवसैनिक हा लढायला कधी घाबरत नाही. परिणामाची चिंता कधी करत नाही. माझा शिरुर मतदार संघ महाराष्ट्रातील सर्वाधिक सुरक्षित मतदार संघ आहे. त्यामुळे निवडणूक न लढविण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही”.

”आम्ही लढणारी माणसे आहेत. युती व्हावी ही मनापासून इच्छा आहे. युती व्हावी ही केवळ शिवसेनेचीच इच्छा नाही. आमच्यापेक्षा जास्त भाजपच्या खासदारांची इच्छा आहे. शिवसेनाला गरज नाही. जास्त भाजपला गरज आहे. आमचे नुकसान होईल. त्यांचा फायदा होईल असेही काही नाही. हे सगळे शिवसेना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे” असा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.