Pimpri : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या शहरातील पदाधिका-यांना येणार अच्छे दिन ?

एमपीसी न्यूज – राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस ‘महाविकासआघाडी’चे सरकार स्थापन झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही पक्षाच्या पदाधिका-यांना विधानपरिषद, महामंडळाचे अध्यक्षपद मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. शहरातील तीनही पक्षाच्या पदाधिका-यांना अच्छे दिन येण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. महापालिकेची निवडणूक सव्वा दोन वर्षावर आली आहे. त्यादृष्टीने तीनही पक्षाचे नेते शहरातील नेत्यांना राजकीय ताकद देण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद मिळण्यासाठी तीनही पक्षातील पदाधिकारी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्राधिकरणाच्या समितीवर शिवसेनेच्या दोन पदाधिका-यांची नियुक्ती झाली होती. तसेच म्हाडाच्या उपाध्यक्षपदी आणि सदस्यपदी शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिका-यांची वर्णी लागली होती. मंत्र्याच्या स्वाक्षरीचे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

मात्र लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही समितींच्या सदस्यपदाचे शासनादेश निघाले नाहीत. निवडीचे पत्र मिळूनही केवळ अधिकृतपणे अध्यादेश न निघाल्याने शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती. भाजपने शहरातील तिघांना राज्यमंत्री दर्जाचे पद दिले होते. परंतु, सत्तेत असूनही शहरातील एकाही शिवसैनिकाला पद मिळाले नव्हते. आता भाजप विरोधात आहेत. तर शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे शहरातील शिवसेनेच्या पदाधिका-यांना पद मिळण्याची अपेक्ष आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मागील पाच वर्ष विरोधात होते. आता राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे सरकार आल्याने दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना देखील विधानपरिषद अथवा एखादे महामंडळ शहराला मिळावे अशी अपेक्षा आहे. तीनही पक्षाच्या पदाधिका-यांना अच्छे दिन येण्याची अपेक्षा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1