BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : युवासेना पिंपरी विधानसभेच्या ‘कार्य अहवाल’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज – गेली सहा महिन्यापासून सामन्य जनतेला मदत करण्यासाठी युवासेनेचे विस्तारक वैभव थोरात व जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सामाजिक कार्याची माहिती ‘कार्य अहवाल’मध्ये देण्यात आली आहे. यात आंदोलन, उपोषण, भ्रष्टाचार विरोधात वेळोवेळी आवाज उठविणे, सामाजिक कार्य आदी गोष्टींचा समावेश असून या ‘कार्य अहवाल’चे प्रकाशन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

‘महायुती’चे उमेदवार आमदार गौतम चाबुकस्वार ह्यांच्या प्रचार सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले होते. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर,शिवसेना उपनेत्या नीलम गोरे, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, रघुनाथ कुचीक, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे कामगार नेते इरफान सय्यद, शहरप्रमुख योगेश बाबर पिंपरी संपर्कप्रमुख गिरीश सावंत, नगरसेविका मीनल यादव, अश्विनी चिंचवडे, अमितदादा गावडे, प्रमोद कुटे, युवासेना जिल्हा सन्मवयक जितेंद्र ननावरे, युवासेना मावळ तालुका प्रमुख अनिकेत भाऊ घुले उपस्थित होते.

अहवाल प्रकाशनचे नियोजन युवती अधिकारी प्रतिक्षा घुले व विभाग संघटक निलेश हाके यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2

.