Pimpri : शिवशाही व्यापारी संघाचा महायुतीस पाठिंबा- युवराज दाखले

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजप व मित्र पक्षांची महायुती झालेली आहे. जागा वाटपानुसार ठिकठिकाणी मित्र पक्षांच्या उमेदवारांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. राज्यातील शिवसेना व भाजपा महायुतीच्या लोकसभेच्या सर्व उमेदवारांना शिवशाही व्यापारी संघाने बिनशर्त जाहीर पाठींबा दिला आहे अशी माहिती शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी दिली आहे.

युवराज दाखले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रदेश सचिव गणेश आहेर, प्रदेश कार्याध्यक्षा महिला आघाडी सुनीता खंडाळकर, प्रदेश उपाध्यक्षा भाग्यश्री म्हस्के तसेच महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी एकजुट व एकदिलाने महायुतीच्या लोकसभेच्या सर्व अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठींबा देत आहोत.

  • यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील, माऊली जाधव, मारूती म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, धाराशिव उस्मनाबाद जिल्हाअध्यक्ष प्रशांत पोचापुरे, सातारा जिल्हाअध्यक्ष रमेश दाखले, उल्हासनगर, महात्मा गांधीनगर अध्यक्ष कृष्णा गायकवाड, मोहीत सुलाखे, संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा अध्यक्ष नितीन देशमुख, बबलु वाणे, खलापुर तालुका अध्यक्ष छगन राठोड, कर्जत तालुका अध्यक्ष सुहास ठाकरे, नवी मुंबई बेलापुर विधानसभा अध्यक्ष, मिथुन खोपडे, नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष योगेश घोरपडे, शिवशाही व्यापारीसंघ महिला अघाडी प्रदेश कार्याध्यक्षा सुनिता खंडाळकर, प्रदेश उपाध्यक्षा भाग्यश्री म्हस्के, पुणे शहर महिला आघाडीच्या शहर उपध्यक्षा महादेवी जळकोटे, संगीता नाईक आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.