Pimpri : धक्कादायक ! पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 27 पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Shocking! 27 police from Pimpri Chinchwad Commissionerate corona positive : आत्तापर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण 97 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून जनतेचे रक्षण करणारे पोलिस कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. बुधवारी (दि.8) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 27 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आले आहे.

यामध्ये पिंपरी पोलीस ठाण्याचे 2 अधिकारी व 9 पोलिस कर्मचारी, अशा एकूण 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच हिंजवडी, भोसरी, निगडी पोलिस ठाण्यातील 16 कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल आज पाॅझिटिव्ह आले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात आत्तापर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण 97 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. पैकी 26 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 68 जणांवर शहरातील विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

झोपडपट्टी परिसर तसेच कंटेनमेंट क्षेत्रात पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात राहवे लागते. तसेच नाकाबंदी व पोलिस ठाण्यात कामासाठी येणाऱ्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे सहायक पोलिस आयुक्त राजाराम पाटील यांनी सांगितले.

पोलिस कर्मचाऱ्यांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी त्यांना आर्सेनिक अल्बम 30, झिंक सल्फेट तसेच व्हिटॅमिन डीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा पोलीस कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.