Pimpri: प्लॅस्टिक वापरणाऱ्यावर धडक कारवाई; 40 व्यावसायिकांकडून दोन लाखाचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आज (शनिवारी) प्लॅस्टिक बंदी अंतर्गत धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तब्बल 40 व्यावसायिकांकडून सुमारे दोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईस विरोध करणाऱ्या रहाटणीतील एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कोकणे चौक व परिसरात प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी अनिलकुमार रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी विनोद बेंडाळे, संजय कुलकर्णी, राजेश भाट, गणेश देशपांडे, महादेव शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक राजु बेद, अभिजीत गुमास्ते, आरोग्य निरीक्षक विजय दवाळे, चंद्रकांत रोकडे, शांताराम माने, सुरेश चन्नाल, शेखर निंबाळकर, सतीश इंगेवाड, राजू साबळे, सुधीर वाघमारे, अंकुश झिटे, एस. पी. घाटे, उद्धव डवरी, रश्‍मी तुडलवार, वैभव कंचनगौडार आदींनी कारवाईमध्ये सहभाग घेतला. यामध्ये 26 दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच कारवाईला विरोध केल्याने बेल्जियन वाफेल्स या दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘फ’ प्रभागांतर्गत निगडी येथे पाच व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुख्य आरोग्य निरीक्षक गायकवाड, आरोग्य निरीक्षक महेश आढाव, वैभव घोळवे, सतीश पाटील, आरोग्य कर्मचारी रामचंद्र शिंगाडे, दत्तात्रय घोडके यांच्या पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक उमेश कांबळे यांनी चार व्यावसायिकांवर कारवाई करून वीस हजार रुपये दंड वसूल केला.

तसेच “अ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत पिंपरी येथील आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले यांनी पाच व्यावसायिकांवर कारवाई करून पंचवीस हजार रुपये दंड वसूल केला. ही कारवाई यापुढे सलग दहा दिवस सुरू राहणार असल्याची माहिती डॉ. अनिलकुमार रॉय यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.