Pimpri : सहा डुकरांना क्रुरपणे जाळल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे उघड

एमपीसी न्यूज – पिंपरीतील संत तुकराम नगर (Pimpri) येथील एच.ए. ग्राऊंड या मैदानात काही जणांनी सहा डुकरांना जाळल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.17) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वकील असलेले प्रज्वल कमलेश दुबे (वय 29, रा.तुकाराम मगर, पिपंरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून त्यानुसार, सुनिल गजरे (वय 23), बबन गजरे (वय 19) रामदास गजरे (वय 40) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामानिमित्त जात असताना त्यांना काही जण गाडीमधून डुकरांना खाली उतरवताना दिसले. संशय आल्याने फिर्यादी यांनी त्वरीत महापालिका पशुवैद्यकीय विभागाला फोन केला. ‘अशी’ घटना घडत असून असा काही परवाना महापालिकेने दिला आहे का? याची विचारणा केली. यावेळी त्वरीत महापालिकेने आरोग्य निरीक्षकाला तेथे पाठवले.
फिर्यादी यांनी दरम्यान काही प्राणी मित्रांना तेथे बोलावले. जवळ (Pimpri) जाताना त्यांना एक जिवंत डुक्कर दिसले पुढे काही
अंतरावर सहा डुकारांना जाळून टाकण्यात आल्याचे धक्कादायक दृश्य फिर्यादी व प्राणी मित्रांना दिसले. यानंतर पोलिसांना संपर्क साधत याबाबत रितसर तक्रार देण्यात आली. तेथील दृश्य पाहता अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. पिंपरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.
Chakan : अपघातात वीजखांब जमीनदोस्त; पर्यायी व्यवस्थेतून चाकणमधील वीजपुरवठा सुरु