Pimpri: धक्कादायक!; डॉक्टरला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी भागातील रहिवासी आणि काळेवाडी परिसरात क्लिनिक असलेल्या 35 वर्षीय डॉक्टरचे आज (बुधवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. खासगी लॅबमधील हे रिपोर्ट असून डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. देवासमान मानल्या जाणा-या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये त्यांचे रिपोर्ट आज (बुधवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासगी लॅबकडून त्यांचे रिपोर्ट पिंपरी महापालिकेकडे देण्यात आले आहेत. महापालिकेनेही त्यांची पॉझिटीव्ह रुग्ण म्हणून नोंद केली आहे. डॉक्टरांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या डॉक्टरला रुग्णाच्या संपर्कातून की इतर कोणाच्या संपर्कातून लागण झाली याची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे.

दरम्यान, शहरातील रुग्णांची सेवा करणा-या नर्स, आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरुन नागरिकांची सेवा करणा-या पोलिसांनंतर आता तर देवासमान मानल्या जाणा-या डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.