Pimpri: धक्कादायक!; मृत्यू झालेल्या महिलेचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रविवारी उपचारासाठी दाखल झालेल्या पुण्यातील 50 वर्षीय महिलेचा अवघ्या तासाभरात मृत्यू झाला होता. या महिलेचे रिपोर्ट मंगळवारी रात्री उशिरा कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. वायसीएम रुग्णालयात मृत्यू झालेल्या महिलेची माहिती पुणे महापालिकेला कळविली जाणार असून महिलेच्या मृत्यूची नोंद पुणे शहरात केली जाणार असल्याचे पिंपरी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले. यामुळे पिंपरी शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा दोनचा आकडा स्थिर आहे.

ही महिला पुण्यातील मार्केडयार्ड भागातील रहिवाशी आहे. पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात महिला उपचारासाठी दाखल झाली होती. या रुग्णालयाने महिलेला कोरोना संशयित म्हणून रविवारी (दि.20) एप्रिल रोजी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात पाठविले होते. वायसीएम रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या तासाभरातच महिलेचा रविवारी मृत्यू झाला होता.

_MPC_DIR_MPU_II

प्रशासनाने महिलेच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट मंगळवारी (दि.21) रात्री उशिरा आले. त्यामध्ये रविवारी मृत्यू झालेल्या महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. महिलेला कोणाच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली होती हे समजू शकले नाही.

वायसीएम रुग्णालयात मृत्यू झालेल्या महिलेची माहिती पुणे महापालिकेला कळविली जाणार आहे. या महिलेच्या मृत्यूची नोंद पिंपरी-चिंचवड शहरात केली जाणार नसल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे पिंपरी शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा दोनचा आकडा स्थिर आहे.

वायसीएमचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, ”महिला एका खासगी रुग्णालयातून रविवारी वायसीएममध्ये दाखल झाली होती. महिला रुग्णालयात आली तेव्हाच तीची प्रकृती अस्वस्थ होती. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. त्याचेवळी महिलेचा घशातील द्रावाचे नमुने घेतले होते. एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविला होता. त्याचे रिपोर्ट मंगळवारी रात्री पॉझिटीव्ह आले आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.