Pimpri: कंटेन्मेंट झोनबाहेरील शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, हॉटेल सुरु होणार; चहा, पान टप-या बंदच राहणार

भाजी विक्रेत्यांना प्रभाग अधिका-यांकडून पास घेवून नेमून दिलेल्या जागेवरच सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत विक्री करावी लागणार आहे. ; Shopping malls, market complexes, hotels outside the containment zone will be started; Tea, leaves will remain closed

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात  अनलॉक -3 मधील सुविधा उद्यापासून सुरु होणार आहेत. कंटेन्मेंट झोनबाहेरील शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाऊस सुरु राहणार आहेत.

भाजी विक्रेत्यांना प्रभाग अधिका-यांकडून पास घेवून नेमून दिलेल्या जागेवरच सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत विक्री करावी लागणार आहे.

खाद्य पदार्थ पार्सल देता येणार आहेत. तर, चहा, पान, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री 31 ऑगस्टपर्यंत बंदच राहणार आहेत. याबाबतची सुधारित नियमावली आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) जारी केली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लागू केलेल्या अनलॉक तीनचा टप्पा सुरु झाला आहे. अनलॉक तीन मध्ये काही सुविधा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

त्याबाबतची सुधारित नियमावली पालिकेने आज प्रसिद्ध केली आहे. यापूर्वी शहरातील सर्वच भागातील  शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करण्यास परवानगी दिली होती.

पण, आता केवळ प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट) झोनबाहेरील शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

तसेच  प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लॉज, गेस्ट हाऊस अशी निवासी सुविधा पुरविणारे हॉटेल व्यावसांकरिता काही अटींच्या आधारे 33 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पालिकेने हॉटेलमध्ये आयसोलेशन, क्वारंटाईन केंद्र म्हणून मान्यता दिली असेल तर, 100 टक्के वापर अनुज्ञेय राहील. हॉटेल किंवा लॉजिंग मधील रेस्टॉरंट, कॅन्टीनची सोय केवळ तेथे निवासी राहणा-या प्रवाशांसाठी सुरु राहील.

खासगी कार्यालये 15, 10 टक्के किंवा जास्ती असेल त्या मनुष्यबळासह कार्यालये सुरु ठेवता येतील.

सकाळी 9 ते सायंकाळी 7 कालावधीतच दुध, भाजीपाला विक्री सुरु राहील. किरकोळ भाजी विक्रेत्यांना प्रभाग अधिका-यांनी पास दिल्यानंतरच नेमून दिलेल्या जागेवर भाजी, फळे विक्री करता येतील.

अन्न पथारी विक्रेते अथवा फेरीवाले यांना पास मिळाल्यानंतरच किरकोळ सामान विक्री  करता येईल. अन्न, खाद्य पदार्थ विक्री करिता पालिका, अन्न व औषधी प्रशासनाद्वारे अनुज्ञप्ती प्राप्त व्यावसायिकांना फक्त पार्सल सेवेद्वारे विक्री अनुज्ञेय राहील.

या विक्री केंद्रावर अन्न पदार्थाचे सेवन करता येणार नाही.  गर्दी, सुरक्षित अंतराचे पालन करावे लागणार आहे. पान, तंबाखूचा वापर करण्यास मनाई आहे. पुढील आदेशापर्यंत हे नियम लागू असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.