_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri : लाॅकडाऊनपूर्वी शहरात खरेदीसाठी झुंबड ; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Shopping spree in the city before the lockdown; The fuss of social distance

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून  दहा दिवसांसाठी शहरात लाॅकडाऊन लागू करण्यात येणार आहे. मात्र, या लाॅकडाऊनपूर्वी शहरातील नागरिक भाजीपाला, किराणा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपड्यांची दुकाने ते अगदी ‘वाईन शॉप’च्या पुढे खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने काल, शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत दोन्ही महानगरपालिका क्षेत्रात 10 दिवस कडक लाॅकडाऊन लागू करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून10 दिवसांसाठी लाॅकडाऊन करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

लाॅकडाऊनच्या भीतीने ग्राहक भाजीपाला, किराणा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपड्यांची दुकाने ते अगदी वाईन शॉपच्या पुढे खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही तसेच मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत असल्यामुळे चिंता वाढली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिकांना खरेदीसाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले असताना देखील सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासून नागरिक खरेदीसाठी तोबा गर्दी करत आहेत.

शहरात संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात येणार असले तरी अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याबाबत अजून सविस्तर आदेश यायचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.