Pimpri: पिंपरी-चिंचवड शहरात जनता कर्फ्यूला अल्प प्रतिसाद

Pimpri: Short response to public curfew in Pimpri-Chinchwad शनिवारी रात्री सव्वाआठ वाजता आज कर्फ्यू पाळा असे आयुक्तांनी आवाहन केले होते. त्यामुळे आयुक्तांचे आवाहन नागरिकांपर्यंत पोहोचले नाही.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता महापौर उषा ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (दि.05) जनता कर्फ्यू पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाला. महापालिका प्रशासनाकडून कर्फ्यूची माहिती शनिवारी नागरिकांना उशिरा दिली. शनिवारी रात्री सव्वाआठ वाजता आज कर्फ्यू पाळा असे आयुक्तांनी आवाहन केले होते. त्यामुळे आयुक्तांचे आवाहन नागरिकांपर्यंत पोहोचले नाही. परिणामी, नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला.

शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे. त्यासाठी पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एकदा कडेकोट शहर बंदचा निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांमधून करण्यात येत आहे. शहरात आत्तापर्यंत चार हजार 336 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यापार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवडकरांना आज स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, याबाबत महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपमध्ये कोणताही ताळमेळ नव्हता.

आयुक्तांनी शनिवारी रात्री सव्वा आठ वाजता नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन केले होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी याबाबत रविवारी सकाळी माहिती मिळाली. तथापि, शहरातील अनेक व्यवसाय, दुकाने आज सुरूच होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.