Pimpri: 60 टक्‍क्‍यांहून कमी निकाल लागलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीसा

अठरा शाळांपैकी एकाही शाळेचा निकाल 100 टक्के नाही लागला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागातील शाळांचा केवळ 61 टक्के निकाल लागला आहे. हा निकाल गेल्या पाच वर्षांतील निच्चांकी निकाल आहे. यंदा शहरातील दहा शाळांचा निकाल 60 टक्‍क्‍यांहून कमी लागला आहे. त्या शाळांच्या मुख्याध्यापकांना माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.

दहावीतील बोर्डाच्या परीक्षेत महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या अठरा शाळांपैकी एकाही शाळेचा निकाल 100 टक्के लागला नाही. यंदा अठरा माध्यमिक विद्यालयांचा दहावीचा निकाल 61.92 टक्के लागला.

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 23 टक्‍क्‍यांनी घसरण झाली आहे. दहावीच्या परिक्षेसाठी माध्यमिक विद्यालयाच्या शाळांमधील दोन हजार 212 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी एक हजार 460 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

नेहरुनगर माध्यमिक विद्यालय, काळभोरनगर माध्यमिक विद्यालय, फुगेवाडी माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नगर माध्यमिक विद्यालय, श्रमिक नगर- निगडी माध्यमिक विद्यालय, लांडेवाडी माध्यमिक विद्यालय, रुपीनगर माध्यमिक विद्यालय, खराळवाडी माध्यमिक विद्यालय, वाकड माध्यमिक विद्यालय, पिंपरी नगर माध्यमिक विद्यालय या शाळांना नोटीसा बजाविल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.