Pimpri : श्री स्वामी समर्थ मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्साहात साजरी 

एमपीसी न्यूज – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दही हंडीचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे शुक्रवारी जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक विधी तसेच रात्री 10 ते 12 प्रवचन व भजन झाले व रात्री श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात आला.

तसेच दुसऱ्या दिवसी शनिवार ला सकाळी 10 ते 12 काल्याचे कीर्तन युवा कीर्तनकार ह.भ.प.  रितेश पाटील महाराज मलकापूर यांचे झाले. यावेळी जवळील परिसरातील लहान मुले श्रीकृष्णाच्या ड्रेसमध्ये आले होते. त्यांनीच दही हंडी फोडली. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा. हरिनारायण शेळके, राजू गुणवंत, संतोष शेळके, मंगेश पाटील, अर्चना तोंडकर, अंजली देव, सारिका रिकामे, अक्षदा देशपांडे, रेखा शेळके, धाबेकर गुरुजी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like