Pimpri : श्री शितळादेवी मंदिर मूर्तीची सोमवारी ग्रामप्रदक्षिणा

एमपीसी न्यूज – पिंपरी गावातील श्री शितळादेवी मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण समारंभ बुधवारी करवीर पिठाचे श्रीमद्‌ जगद्‌गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते आयोजित करण्यात आल्याची माहिती नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

पिंपरी गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या या सोहळ्यात सोमवारी (17 जून) सकाळी 9 वाजता मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.

  • सकाळी 11 वाजता महासंकल्प, गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य पूजन, स्थलशुद्धी, उदकशांत, शांती होम, जलाधिवास, पुष्पाधिवास, धान्याधिवास, शैयाधिवास आणि मंगळवारी (18 जून) सकाळी 8.30 वाजता प्रासाद वास्तू मंडल स्थापना, मुख्य देवता स्थापना, कुंड संस्कार, नवग्रह स्थापना, ग्रह होम, वास्तू होम, पर्याय होम, सायंकाळी 5 वाजता सप्तसती पाठ व पूजा मंत्रा पुष्प आणि मुख्य समारंभ बुधवारी (19 जून) सकाळी 7 नंतर स्थापित देवता पूजन, कलश स्थापन, प्रायश्चित होम, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलाशारोहण समारंभ, पूर्णाहूती, महापूजा, महानैवेद्य व सायंकाळी 5 नंतर महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.