Pimpri : श्रीरंग बारणे यांना पिंपरीतून ४१ हजार मतांची आघाडी मिळवून दिल्याचे समाधान – ॲड. गौतम चाबुकस्वार

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पिंपरी विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना ४१ हजार २९४ मतांची आघाडी मिळवून दिल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे पिंपरीचे शिवसेना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले.

खासदार बारणे हे पुन्हा दणदणीत मतांनी विजयी झाल्याबद्दल आणि पिंपरी भागातून त्यांना चांगल्या लीड दिल्याबद्दल नगरसेवक तसेच पिंपरी विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, शिवसेनेच्या महिला संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, सरिता साने, राजेश फलके, अमोल निकम, स्वप्नील रोकडे आदींसह शेकडो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदारांवी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पेढे भरविले.

  • यावेळी बोलताना आमदार चाबुकस्वार म्हणाले, ‘तब्बल १९ दिवस पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे संपूर्ण पिंपरी मतदारसंघ पालथा घातला. यावेळी लोकांच्या प्रतिक्रिया, उत्साह, पाहून शंभर टक्के बारणे हे खासदारपदी पुन्हा निवडून येतील, असा विश्वास मिळाला होता. कमीतकमी २५ ते ३० हजारांचा लीड पिंपरीतून असेल आणि १ लाखापेक्षा अधिक मते बारणेंना मिळतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

मात्र, पिंपरीतील मतदारांनी माझ्या कष्टाचे आणि केलेल्या आवाहनाचे चीज करून ४१ हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी पिंपरीतून बारणेंना मिळवून दिली. वंचितच्या उमेदवाराला पिंपरीतून २० हजाराच्या पुढे मते मिळाली असली तरी त्यांनी अजून मते मिळवायची होती. जेणेकरून बारणेंना अधिक लीड मिळाला असता, असे कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.