Pimpri: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर ‘शट डाऊन’ करा – मनसेची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना हा विषाणू दिवसेंदिवस अधिक घातक होत चालला आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. दररोज एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. खबरदारी म्हणून संपुर्णपणे शहर बंद ठेवावे, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी राज्य सरकारकडे केली.

याबाबत चिखले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्रात करोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येला आवर घालण्यासाठी प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण पिंपरी- चिंचवड शहर येत्या 31 मार्चपर्यंत बंद (Shut down) ठेवण्यात यावे. त्या कालावधीत संपूर्ण शहरभर जंतुनाशक द्रव्यांची फवारणी करून शहर निर्जंतुक करण्यात यावे, अशी मागणी चिखले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like