Pimpri: पिंपरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची ‘ही’ आहेत चिन्हे

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अण्णा बनसोडे यांचे घड्याळ, शिवसेना-भाजप महायुतीचे गौतम चाबुकस्वार धनुष्यबाण तर बहुजन समाज पार्टीचे धनराज गायकवाड यांचे हत्ती चिन्ह आहे.

निवडणूक विभागाने आज (सोमवारी) अर्ज माघे घेण्याच्या मुदतीत अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले आहे. त्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे गोविंद हेरोडे यांना खाट, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण गायकवाड यांना गॅस सिलेंडर, भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे संदीप कांबळे यांना ब्रेड, अपक्ष अजय गायकवाड यांना हिरा, अजय लोंढे यांना शिट्टी, मुकुंदा ओव्हाळ यांना फुटबॉल चिन्ह मिळाले आहे.

चंद्रकांत माने यांना पेनाची नीब सात किरणांसह, दिपक जगताप यांना शिवणयंत्र, दिपक ताटे यांना रोड रोलर, नरेश लोट सफरचंद, भाजपचे बंडखोर नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांना अंगठी, मिना यादव प्रेशर कुकर, युवराज दाखले यांना ऑटो रिक्षा, डॉ. राजेश नागोसे यांना कोट आणि हेमंत मोरे यांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.