Pimpri : महाराष्ट्रीय वेशभूषा करून सिंधी महिलांनी साजरा केला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज- सिंधी समाजाच्या सुपर 100 लेडीज सोशल ग्रुपच्या वतीने पिंपरीमध्ये प्रथमच सिंधी समाजातील महिलांनी एकत्र येऊन महाराष्ट्रीय पध्दतीची पारंपरिक वेशभूषा परिधान करून संक्रांतीच्या उत्सवातील संस्कृतीप्रमाणे हळदी- कुंकवाचा कार्यकम केला.

समाजा-समाजामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी पिंपरी गावातील जुन्या वैभवनगर सोसायटीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली 40 वर्षे सिंधी समाज पिंपरीमध्ये वास्तव्यास असल्यामुळे महाराष्ट्रीय संस्कृतीशी पूर्णपणे समरस झालेला असल्याची प्रचिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आली.

यावेळी ग्रुपच्या संस्थापिका किरण रामनानी, प्रिया सबनानी, गिताली आसराणी, नंदिनी तावडेकर, अंकिता भाग्या, पायल जेठवानी, ज्योती मूलचंदानी, अंजली रामनानी, गीता बक्षानी, अंजू केसवानी, अंजू बनवारी, निशा दखनेजा, नीना तिलानी, शारदा सावलानी, रचना मेघराजानी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.