Pimpri: दिवसभरात सहा जण कोरोनामुक्त; दिघी, आनंदनगर, भाटनगरमधील ‘हा’ परिसर सील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात उपचार घेऊन इंदिरानगर, चिंचवड, मोशी, संभाजीनगर, गणेशनगर, तळवडे आणि सांगवीतील सहा जण आज (सोमवारी) कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, आज एकाचदिवशी शहरातील 11 पुरुष आणि 11 महिला अशा 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे  दिघी, आनंदनगर, भाटनगरमधील काही परिसर सील करण्यात आला आहे.  

शहरातील चिंचवडमधील आनंदनगर झोपडपट्टी, भाटनगर, रहाटणी, भोसरी, दिघी परिसरातील 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय महापालिका रुग्णालयात दाखल असलेल्या शहराबाहेरील येरवडा आणि नवी मुंबईतील दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

महापालिकेच्या रुग्णालयात 80 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत 131 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.  शहरातील चार आणि शहराबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात आठ अशा बारा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 48

# पॉझिटीव्ह रुग्ण – 22

#निगेटीव्ह रुग्ण – 70

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 78

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 163

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 72

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 226

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 80

# शहरातील कोरोना बाधित 11 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  12

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 131

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 31079

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 85872

 

दिघी, आनंदनगर, भाटनगर, मोरेवस्ती मधील ‘हा’ परिसर सील!

दिघी, आनंदनगर, भाटनगर, मोरेवस्ती, भोसरी परिसरात आज पुन्हा कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमृतधारा दिघी येथील (विठ्ठल रुक्मिनी मंदीरा समोर-अर्जुन जीम-ओयो होम-जेनेसिस च-होली समोर-आळंदी रोड-ममता स्वीट््स)

मोरेवस्ती चिखलीतील ( ओम मिनी मार्केट-अष्टविनायक चौक-एक्सीस बँक एटीएम-तुषार पान सेंटर समोर-बिस्मिला चिकन शॉपसमोर-कल्पन टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स), भाटनगर पिंपरीतील (किर्वे टेलरसमोर-रेल्वे लाईन-राधिका अर्पाटमेंट-रेल्वे लाईन-डायमंड स्पोर्टर्स-लिंक रोड)

ज्ञानगंगा सोसायटी रहाटणी येथील (श्री गार्डन टी स्पॉट – निर्मल बंगला-आरआर जी टू सोसायटी रोड-रॉयल रहार्डका ग्रीन्स फेज 2 – रॉयल आरेंज काऊंटी रोड), हनुमान कॉलनी भोसरी ( फॅन्सी कॉम्प्युटर पेरिफेरल्स- दुर्गामाता मंदिर-राजगुरु बँक समोर) हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.

या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.