Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात मोटारसायकल चोरीच्या सहा घटना; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी, देहूरोड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मोटरसायकल चोरीचे सहा तर, कारमधील साहित्य चोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर बसमध्ये चढताना एका महिलेच्या हातातून सोन्याची बांगडी हिसकावून नेण्याचा देखील एक प्रकार पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल आहे.

भोसरी – सुभाषचंद्र साधुसरण (वय 30, रा. खंडोबामाळ भोसरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली. सुभाषचंद्र यांनी त्यांची पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / जी आर 8819) खंडोबा माळ येथील न्यूयॉर्क बेकरी जवळ पार्क केली अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

  • भोसरी – बाळकृष्ण नारायण जाधव (वय 56, रा. आदिनाथ नगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बाळकृष्ण यांची वॅगन आर (एमएच 14 / जीएस 3644) कारमधील तसेच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तीन जणांच्या कारमधील टेप, बॅग आणि रोख रक्कम असा एकूण 22 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच चोरट्यांनी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले.

भोसरी एमआयडीसी – बाळू वामन निगळे (वय 42, रा. मोशी) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यांची दहा हजार रुपये किमतीची होंडा शाइन (एमएच 14 / डी एल 4827) ही इंद्रायणीनगर भोसरी येथे लॉक करून पार्क केली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

  • चिखली – संतोष दीपक पाटील (वय 34, रा. चिखली) यांची पंचवीस हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एमएच 14 / एफएल 4085) घराच्या समोर रस्त्याच्या बाजूला पार्क केली असता अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

वाकड – विशाल मारुती दबडे (वय 31, रा. दळवीनगर आकुर्डी) यांची डांगे चौकातील एका बँकेसमोर पार्क केलेली तीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / ए एन 7764) चोरट्यांनी चोरून नेली.

  • देहूरोड पोलीस ठाण्यात दोन वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये सुयश विलास देशमुख (वय 22) यांची पंचवीस हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची पल्सर (एम एच 14 / ई आर 6523) विकास नगरमधील सिद्धिविनायक मंदिरासमोरून चोरून नेली.

राजवर्धन तनपुरे (वय 19) यांनी त्यांची पंधरा हजार रुपये किमतीचे होंडा शाइन (एम एच 16 / ए जी 3026) घराच्या बाहेर हॅण्डल लॉक करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.

  • याचबरोबर कौशल्या जयसिंग कोंडे (वय 80, रा. नेहरूनगर) या पिंपरी महापालिकेचे समोरून बस मधून प्रवास करत होत्या. बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील 50 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी काढून घेतली. याबाबत त्यांनी पिंपरी पोलिसात गुन्हा नोंदवला. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.