Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात सहा पॉझिटिव्ह; एकाला दिला डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील दोन तरुण आहेत तर चार महिला आहेत. यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 121 झाली आहे. 98 जणांचे अहवाल सध्या प्रतीक्षेत आहेत. एक रुग्ण आज (रविवारी, दि. 3) कोरोनामुक्त झाला आहे.

शहरात आज 21, 22 वर्षीय दोन तरुणांचा तर 40 वर्षीय दोन, 71 वर्षीय एक वृद्ध महिला आणि 14 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे रुग्ण पिंपळे सौदागर, चिंचवड, जुनी सांगवी, मोशी परिसरातील आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला असला तरी समाधानकारक बाब ही की आज एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर एकाने आज कोरोनावर मात केली आहे. या रुग्णाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी तिसऱ्यांदा वाढवण्यात आला आहे. हा कालावधी 4 मे पासून 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 भागात कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत.

कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या भागातून बाहेर अथवा बाहेरील भागातून आत जाता येणार नाही. पुढील आदेशपर्यंत हा भाग सील करण्यात आला आहे. आजवर शहरात कोरोनाची लागण झालेले 121 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजवर शहरात पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उर्वरित रुग्णांवर पिंपरी आणि भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज 189 जणांचे अलगीकरण केले आहे. प्रशासनाने आज 16 हजार 730 घरांना भेट देऊन 60 हजार 350 जणांचे सर्वेक्षण केले आहे.

  • शहरातील दोन परिसर आजपासून सील –
    पिंपळे सौदागर येथील पकवान स्वीटस, कुणाल आयकॉन रोड, ओम दत्तराज मंदिर, रोज वुड सोसायटी, सोमनाथ स्क्रॅप सेंटर, ओमचैतन्य डेअरी, एमएसईबी ऑफिस, पकवान स्विटस आणि इंदिरानगर चिंचवड येथील महिंद्रा टू व्हीलर शोरूम, सरस्वती को-ऑप. बॅंक, डबल ट्री हिल्टन, कॉर्पोरेशन बॅंक, एएसएमएस आयबीएमआर कॉलेज, तेजस एंटरप्रायजेस, सायन्स पार्कच्या मागील बाजू, महिंद्रा टू व्हीलर शोरूम हे दोन परिसर आज (रविवारी) रात्री अकरा वाजल्यापासून पुढील आदेशपर्यंत सील केले जाणार आहेत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like