Pimpri : जगातील सर्वात खडतर कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये धावणार पिंपरी-चिंचवडमधील सहा धावपटू

बुधवारी स्पर्धेसाठी होणार डर्बनला रवाना

एमपीसी न्यूज – जगातील सर्वात खडतर अल्ट्रा मॅरेथॉनपैकी एक म्हणून दक्षिण आफ्रिकेतील 87 किलोमीटर अंतराची कॉम्रेड्स मॅरेथॉन ओळखली जाते या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील सहा धावपटूंची निवड झाली असून ही शर्यत पूर्ण करण्यासाठी बुधवारी (ता. 5) हे धावपटून डर्बनला रवाना झाले. 

पीसीएमसी रनर्सचे पी. वेणुगोपाल, चंद्रकात पाटील, भूषण तारक, कमल तिलानी, सचिन सिंग आणि जनार्दन कट्टुळ अशी या हा धावपटूंची नावे आहेत. 9 जून रोजी पहाटे साडेपाच वाजता डर्बन येथुन शर्यतीला सुरुवात होणार असून सेंट पीटरमॅटीजबर्ग येथे शेवट होणार आहे. यापैकी वेणुगोपाल, पाटील यांनी यापूर्वीही या शर्यतीत भाग घेतला असून त्यांची ही दुसरी वेळ आहे. पीसीएमसी रनर्सच्या धावपटूंनी त्यांच्यासमवेत दहा किलोमीटर अंतर धावून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये अवनिश उपाध्याय, अमित कुलकर्णी यांच्यासह 35 धावपटुंनी सहभाग घेतला.

या स्पर्धेबाबत धावपटू भूषण तारक म्हणाले, “कॉम्रेड्स मॅरेथॉन शर्यत अप आणि डाऊन या दोन प्रकारे भरविली जाते. .यंदाची अप मॅरेथॉन आहे. 87 किमी अंतर हे बारा तासांत पूर्ण कऱण्याचे लक्ष्य धावपटूंसमोर ठेवले आहे. शर्यतीच्या मार्गावर पाच मोठ्या टेकड्या आणि पन्नास लहान टेकड्या असून, स्पर्धकांना सतत चढावर धावावे लागते. यामध्ये मी प्रथमच सहभाग घेत आहे”

या स्पर्धेसाठी या धावपटूंनी सरावाला जानेवारीपासून सुरुवात केली. भंडारा डोंगर, दुर्गादेवी टेकडी, सिंहगड या ठिकाणी धावपटूंनी सराव केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.