Pimpri :साथी एस एम जोशी फुटबॉल स्पर्धा सोमवारपासून

एमपीसी न्यूज – साथी एस एम जोशी स्मृती चषक फुटबॉल स्पर्धा सोमवार (दि.२) पासून सुरू होत आहे. २३ मार्च पर्यंत चालणारी ही स्पर्धा संत तुकाराम नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पार पडणार आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते अल्ताफ शेख, आर्मी बेस वर्कशॉप ए.सी.ई युनियन व ए.आर शेख यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेला पुणे जिल्हा फुटबॉल संघाची मान्यता मिळाली असून पुण्यातील पुरूषांचे व महिलांचे नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.