Pimpri: ‘स्मार्ट सिटी’ परिषदेतील नावीन्यपुर्ण प्रकल्पांची शहरात अंलबजावणी करु – आयुक्त हर्डीकर 

एमपीसी न्यूज – स्पेन देशातील बार्सिलोना येथे झालेल्या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018’ या परिषदेत 20 देशातील स्मार्ट सिटीतील कामाची माहिती एका छताखाली मिळाली. नागरी विकास, तंत्रज्ञान, लोकसहभागातून शहरविकास कसा साधता येतो याची उदाहारणे बघितली. सार्वजनिक परिवहन, सक्षमीकरण, पादचारी, सायकलस्वारांना प्राधान्य, प्रशस्त हॉकर्स झोन कसे असावेत याची पाहणी केली. स्मार्ट सिटीचा विकास करताना तंत्रज्ञानाचा वापर करुन या नाविन्यपुर्ण प्रकल्पांची अमंलबजावणी करु, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच नाविन्यपुर्ण प्रकल्पांची अंमलबजावणी करणे कठिण आहे, पण अशक्य नाही, असेही ते म्हणाले. 
स्पेन येथील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या  ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018’ या परिषदेत स्मार्ट सिटीचे संचालक सहभागी झाले होते. त्यानंतर आज (शुक्रवारी)अधिकारी आणि पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन दौ-याची माहिती दिली. त्यावेळी आयुक्त हर्डीकर बोलत होते. महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, स्मार्ट सिटी सेलचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आणि सह शहर अभियंता राजन पाटील उपस्थित होते.
दौ-याचा अनुभव व्यापक होता. परिणामकारक शिकण्यासारख्या गोष्टी दौ-यातून मिळाल्या असल्याचे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, जगातील स्टॉप शहरांचे माहितीचे स्टॉल तिथे होते. त्यांनी सविस्तर माहिती दिली. स्मार्ट सिटीअंतर्गत जगभरातील कामाची माहिती मिळाली. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात एकत्रित विविध नाविन्यपुर्ण प्रकल्पांची माहिती घेतली. त्याचबरोबर स्मार्ट शहर असलेल्या बार्सिलोना शहराने काय-काय सुधारणा केल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती होती. त्याचे सादरीकरण पहायला मिळाले. जगभरातील विख्यात, महापौर, सामाजिक संस्थांनी आपले अनुभव शेअर केले.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, कमांड आणि कंट्रोल सिस्टीम उत्तम आहे. विविध संस्थांनी बनविलेल्या तंत्रज्ञान एकाच छताखाली पहायला मिळाले. दहा शहरांचा दौरा करुन जेवढी माहिती मिळणार नाही. तेवढे या एकाच दौ-यातून शिकण्यास मिळाले. बाईक, ई-बाईक,  ‘इलेक्‍ट्रिक’ बस अशा स्मार्ट उपक्रमाचे सादरीकरण झाले. बार्सिलोना शहरात क्रीडा क्षेत्राला मोठे महत्व आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात देखील क्रीडा संस्कृती निर्माण केली जाईल. युवकांना खेळाकडे प्रोत्साहित करण्यात येईल. शहरातून जास्तीत-जास्त खेळाडू तयार केले जातील.
विकास योजना सुधारित करण्याचे काम हाती घेतले आहे. नवीन विकसित होणा-या भागात नाविन्यपुर्ण प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार आहे. फुटपाथ, सायकल ट्रॅक प्रशस्त केले जाणार आहेत. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यावर भर दिला जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले. दौ-यातून शहराचा फायदा होणार आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांना देखील दौ-यावर नेणे आवश्यक आहे. बार्सिलोना दौ-याचा खर्चाची प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण केली आहे. त्याचे सर्व ‘रेकॉर्ड’ ठेवले जाईल. त्यामध्ये कुठेही अनियमितता झाली नाही, असेही ते म्हणाले.
बार्सिलोना शहर सुंदर आहे. त्याप्रमाणे पिंपरी शहर बनविण्यासाठी मोठी ‘कुर्बाणी’ द्यावी लागले. त्यानंतरच शहराचा विकास होईल. तसेच नागरिकांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले. शहराबाहेर जात नाही. तोपर्यंत ‘व्हिजन’ येत नाही. त्यासाठी दौरे करणे आवश्यक आहे. त्यासाठी दौ-यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला तरी त्याचे समर्थनच केले पाहिजे, असे सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.