Pimpri : पिंपरी-चिंचवडमधून संगीता जोगदंड यांना गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे कामगार कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांनी सन 2017 चे महाराष्ट्र राज्यातील गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केले. पिंपरी-चिंचवडमधून संगीता जोगदंड या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये राज्यातून एकूण 53 गुणवंत कामगारांची तर एक कामगार भूषणची नावे जाहीर केली. पुरस्कार प्रदान सोहळयाची तारीख लवकरच जाहीर केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

  • पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतून चार गुणवंताची निवड केली. संगिता श्रीकांत जोगदंड, धर्मवीर संभाजी को-आँ.बँक लि.सांगवी, शिवराम मनोहर गवस, सिमंड मार्शल लि.कासारवाडी. ईसमाईल नसरुद्दीन मुल्ला, दत्तात्रय प्रल्हाद अवसकर, दोघेही टाटा मोटर्स पिंपरी. परंतु कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार मिळणाऱ्या संगिता जोगदंड असून त्याचे पती श्रीकांत जोगदंड हे 2014चे गुणवंत कामगार पुरस्कारार्थी आहेत. पिंपरी चिंचवड शहराला पहिलेच पती -पत्नी हे गुणवंत होण्याचा मान मिळाला. यामुळे सर्व थरातून त्याचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.