BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: …म्हणून चिंचवड, भोसरीच्या अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले – अजित पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या पाच वर्षात गुन्हेगारी, भ्रष्टाचार वाढलेला आहे. भारतीय जनता पक्षाने वाढविलेला हा भ्रष्टाचार थांबविण्याबरोबरच शहराच्या विकासासाठीच विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने अपक्ष उमेदवारांना पाठींबा देत भोसरीमधून विलास लांडे आणि चिंचवड मतदारसंघातून राहूल कलाटे यांना पुरस्कृत केले असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिले.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील दोन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार न देता अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. या भूमिकेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह विविध स्तरावरून जोरदार टीका केली जात होती.

राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षम उमेदवार मिळत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

भाजपच्या काळात झालेला हा भष्टाचार थांबविण्यासाठी तडजोड करत चिंचवड आणि भोसरीमध्ये अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मतदरासंघासह पिंपरी मतदारसंघात पक्षाने उमेदवारी दिलेले माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारात राष्ट्रवादी कुठेही कमी पडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना दिल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3