Pimpri : …तर महापालिका भवनात कोरोनाचे रुग्ण आणू : बशीर सुतार

So let's bring Corona's patient to the municipal building: Bashir Carpenter : कोरोना रुग्णांना त्वरित बेड उपलब्ध करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नसल्याने अशा रुग्णांची हेळसांड होते. या परिस्थितीत तात्काळ सुधारणा करावी आणि कोरोना रुग्णांना त्वरित बेड उपलब्ध करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा. बेड अभावी एखाद्या कोरोना रुग्णांचे हाल झाल्यास संबंधित रुग्णाला थेट महापालिका भवनात नेण्यात येईल, असा इशारा शिवसेना पिंपरी चिंचवड शहर कार्यालयप्रमुख बशीर सुतार यांनी दिला आहे.

या संदर्भात बशीर सुतार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, मागील आठवड्यापासून करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी असल्याने बहुसंख्येने कामगार कामानिमित्त बाहेर पडत आहेत. त्यामुळे कंपनीत काम करताना संपर्क टाळता येत नाही शिवाय सोशल  डिस्टंसिंग  पाळता येत नाही.

रुग्ण झपाट्याने वाढण्याचे कारण म्हणजे एक परिवार एका फ्लॅटमध्ये रहात असेल व एकाला करोनाची लागण झाली तर संपूर्ण परिवाराला संसर्गामुळे करोनाची लागण होते. त्यामुळे सर्व परिवार कोरोना चाचणीसाठी जातो.

यामध्ये कुणी पॉझिटिव्ह मिळाल्यास रुग्णांलयात दाखल होण्यासाठी धावपळ सुरू होते. परंतु, पेशंटला ॲडमिट होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत ही वस्तुस्थिती पिंपरी-चिंचवडमध्ये शहरात आहे.

त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच बेड उपलब्ध करण्यासाठी धावपळी करावी लागते.

शहरातील वाल्हेकरवाडी येथील एका रुग्णाला तब्बल दीड दिवसांनंतर आकुर्डीतील रुग्णांलयात बेड उपलब्ध झाला. यामध्ये त्या रुग्णांसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

पिंपरी-चिंचवड ही श्रीमंत महानगरपालिका आहे. येथे कार्यरत महापालिका आयुक्त हुशार आहेत. त्यांची टीमही चांगली आहे.

त्यामुळे काळाची गरज लक्षात घेत झटपट निर्णय घेऊन कोरोना रुग्णांसाठी तात्काळ बेड उपलब्ध करून दिले पाहिजेत, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

महानगरपालिकेकडे उच्च शिक्षित टीम आहे. निधी आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. तरीसुद्धा जलद नियोजन का होत नाही ?. नागरिकांच्या सोयीसाठी चौकाचौकात महानगरपालिकेने डिजिटल बोर्ड डिस्प्ले केले पाहिजेत.

त्यामध्ये कोरोनाचे हॉस्पिटल, बेडसंख्या, उपलब्ध बेड याची माहिती दिल्यास रुग्णांची  हेळसांड थांबेल. त्यामुळे याची तात्काळ अंमलबजावणी करा; अन्यथा नागरिकांचा उद्रेक होईल. तसे झाल्यास महापालिकेत करोनाचे रुग्ण आणले जातील, असा इशारा बशीर सुतार यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.