Pimpri: शहर खड्ड्यात !

पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र खड्डेच-खड्डे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात पावसाचे प्रमाण तुरळक असतानाही रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. डांबरीकरणाचे रस्ते पूर्णपणे उखडले असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील सर्वच भागातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

शहरात अमृत योजनेअंतर्गत 24 तास पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणची कामे, भूमिगत गटारे आणि विविध केबल डक्टसाठी शहरात सर्वत्र खोदाई केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पिंपरी, चिंचवड, वाकड, भोसरी, निगडी, पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, थेरगाव, डांगे चौक, भोसरी, एमआयडीसी, केएसबी चौक, भक्ती-शक्ती चौक परिसरातील सर्वत्र सेवा रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत.

पिंपळे सौदागर जगताप डेअरी चौक
अंकुश चौक निगडी
भोसरी लांडेवाडी चौक
चापेकर चौक चिंचवड
डांगे चौक

दुर्गानगर चौक
भोसरी एमआयडीसी रस्ता
गोविंद गार्डन चौक पिंपळे सौदागर
पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील खड्डा
सुदर्शन चौक पिंपळे गुरव
भोसरी एमआयडीसी चौक
काळभोरनगर, आकुर्डी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.