Pimpri News: सोलापूरातील सोशल, ग्लोबल इंडिया फांऊडेशनतर्फे कोरोना रुग्णांसाठी पिंपरी पालिकेला ‘इम्युनिटी ज्युस’

पालिका रुग्णालये, दवाखान्यांमध्ये हा ज्यूस मोफत देण्यात येणार असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व फैलाव लक्षात घेता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन व ग्लोबल इंडिया फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी पालिकेला डाबर कंपनीचे इम्युनिटी ज्युस देण्यात आला आहेत.

दरम्यान, पालिका रुग्णालये, दवाखान्यांमध्ये हा ज्यूस मोफत देण्यात येणार असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.

माजी मंत्री, भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या सोलापूर सोशल फाऊंडेशन तसेच भारतभर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ग्लोबल इंडिया फाऊंडेशनकडून महापालिकेला 10 टन इम्युनिटी ज्युस मोफत दिले आहे.

महापौर ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके यांनी ते अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

त्यात कोविड-19 रुग्णांची इम्युनिटी वाढविण्यासाठी डाबर कंपनीचे आवळा, मोसंबी, संत्रे अशा विविध पद्धतीचे 10 टन इम्युनिटी ज्युस आहेत. पालिका कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढत आहे.

त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडून विविध पातळयांवर नियोजन व व्यवस्थापन करण्यात येत असल्याचे महापौर ढोरे, सभागृह नेते ढाके यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.