एमपीसी न्यूज : कोरोनाच्या महामारीमुळे अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद आहेत. या व्यवसायातील अनेक कामगार संकटात सापडलेले आहेत. परगावातून आलेले एकटे कामगार आज जास्त अडचणीत आहेत. सर्व खानावळी हॉटेल्स बंद झाल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. काम बंद असल्यामुळे आर्थिक अडचणीतही भर पडलेली आहे. लॉक डाऊन मुळे  कामगार एकत्र येऊन काही मागणीही करू शकत नाहीत. त्यामुळे कामगार कष्टकरी सामान्य जनता यांच्यामध्ये काम करणाऱ्या काही ध्येयवादी संस्था या परिस्थितीत कामगारांना मदत करायला पुढे आलेल्या आहेत. 

लोक जागर ग्रुप आणि डीवायएफआय यांची कामगारांसाठी ‘जनता थाळी’

एकटे राहणाऱ्या व्यक्तींनी अल्पदरात  जीवनाची सोय करून देत आहेत यासाठीलोक जागर ग्रुप आणि डीवायएफआय यांनी ‘जनता थाळी’ उपक्रम सुरू केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी डॉ. सुरेश बेरी – 9881242696 लोक जागर ग्रुप, सचिन देसाई – 7387523929 डी वाय एफ आय, स्वप्निल जेवळे- 9595952102 डी वाय एफ आय यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी व 9595952102 या क्रमांकावर गुगल पे किंवा फोन पे करुन रक्कम जमा करण्याचे आवाहन केले आहे.

सॅनी हेवी इंडस्ट्री आणि समर्पण ग्रीन फाउंडेशन कडून 120 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

सॅनी हेवी इंडस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचे प्रशासकीय अधिकारी श्री. दिपक गर्ग आणि त्यांचे सहकारी योग्य काळजी घेत तसेच समर्पण ग्रीन फाउंडेशन या सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत चाकण येथील कडाचीवाडी गावातील 120 कुटुंबाना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.

या उपक्रमासाठी कंपनीचे संस्था स्वयंसेवक अमर निंबाळकर, विनित मोरे तसेच कडाचीवाडी चे सरपंच महादेव बचुटे, उपसरपंच प्रियंका कड, ग्रामसेवक निलिमा जाधव, ग्रामपंचायत सदस्य निर्मला कड, सोनल कोतवाल, राजाराम ठाकर, तलाठी शाम वालेकर, उपसरपंच पांडुरंग लष्करे, सामाजिक कार्यकर्ते किरण कड या सर्वांचे सहकार्य लाभले.

मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने गरजू लोकांसाठी ‘अन्नछत्र’

कासारवाडी येथील मातृभूमी प्रतिष्ठान च्या वतीने गरजू लोकांना तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका साफसफाई  कर्मचारी वर्ग आणि इतर गरीब नागरिक यांना अन्नछत्र या माध्यमातून दोन वेळचे जेवण स्वतः तयार करून त्याचे वाटप करण्यात येत आहे .रोज 450 लोक या अन्नदान सेवेचा लाभ घेत आहेत. ही सेवा लॉकडाऊन पूर्ण होत पर्यंत   अखंडितपणे  चालू राहणार असून गरजु लोकांनी मातृभूमी प्रतिष्ठानला संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

या अन्नदान उपक्रमास अतुल दौडकर, अनिकेत कडदेकर, चेतन मेसता, यशवंत गंभीरे, विवेक कन्नलू , मीरा कुळकर्णी यांचे सहकार्य लाभले आहे.