Pimpri : सांगलीतील पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची पिंपरीमध्ये आत्महत्या

एमपीसी न्यूज – सांगली येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या मुलाने पिंपरी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, गुरुवारी (दि. 26) पहाटे दीडच्या सुमारास मोरवाडी पिंपरी येथे उघडकीस आली.

अभिषेक अजित दळवी (वय 29) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक हा आई आणि पत्नीसह मोरवाडी येथे राहत होता. तर वडील अजित दळवी हे नोकरीनिमित्त सांगली जिल्ह्यात असतात. अजित दळवी हे सांगली येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. एक वर्षापूर्वी अभिषेकचे लग्न झाले आहे. बुधवारी रात्री अभिषेकने मद्यपान केल्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला.

बराच वेळ झाला तरी त्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आई आणि पत्नीने दरवाजा उघडण्याची विनंती केली. मात्र, आतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर त्याच्या चुलत भावाला बोलावून दरवाजा उघडण्यास सांगितले. त्याने पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडला असता अभिषेक पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. अभिषेकच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1