_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri: अर्थसंकल्प मंजुरीसाठी सोमवारी विशेष सभा

Special meeting on Monday for budget approval

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2020-21 चा अर्थसंकल्पाला अद्याप सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी येत्या सोमवारी (दि.1) दुपारी दोनला विशेष सभा आयोजित केली आहे. दरम्यान, आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात अर्थसंकल्पाची अमंलबजावणी सुरु केली आहे. तरी देखील महासभेची मान्यता घेणे आवश्यक होते. त्यानुसार सोमवारच्या सभेत अर्थसंकल्पाला मान्यता दिली जाईल.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केंद्र व राज्य शासनाचा निधी अशा एकूण एकूण 6 हजार 627 कोटी 99 लाख निधीचा अर्थसंकल्प तयार केला आहे. तो स्थायी समितीसमोर 17 फेब्रुवारीला सादर केला. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी तो अर्थसंकल्प स्वीकारत 27 फेब्रुवारीला त्याला विशेष सभेत मंजुरी दिली. अर्थसंकल्पास सुमारे 700 कोटींच्या एकूण 6 उपसूचना दिल्या आहेत.

त्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली. परिणामी, 31 मार्चपर्यंत त्या अर्थसंकल्पास मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे आयुक्तांनी सादर केलेला अर्थसंकल्प पालिका प्रशासनाने लागू केला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील आर्थिक मंदीमुळे राज्य शासनाने सर्व महापालिकांना एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ 33 टक्के खर्चास मंजुरी दिली आहे.

त्यात वैद्यकीय, आरोग्य आणि अत्यावश्यक कामांना प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने अधिकार्‍यांची समिती स्थापन करून खर्चाला निर्बंध घालण्यासाठी समितीने शिफारशी करण्याची सूचना केली आहे. समितीनुसार अर्थसंकल्पात काही बदल केले जाऊ शकतात.

_MPC_DIR_MPU_II

अर्थसंकल्पला मंजुरी देण्यासाठी विशेष सभा सोमवारी आयोजित केली आहे. त्यात स्थायी समितीने सुचविलेल्या सर्व कामे स्वीकारले जातात की नाही हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे.

सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत सभा घेण्याचे नियोजन

संचारबंदीमुळे महापालिका सर्वसाधारण सभा घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पालिकेचे एकूण 133 नगरसेवक आहेत. सभा कामकाजासाठी किमान 43 नगरसेवकांची उपस्थिती आवश्यक आहे. रविवारी (दि.31) लॉकडाऊन चौथा टप्पा संपणार आहे.

त्यानंतर संचारबंदीत शिथिलता मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सोमवारची पालिका सभा सोशल डिन्टन्सिंग ठेऊन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एका बाकावर दोन जणांप्रमाणे सभागृहात 80 नगरसेवक बसतात. प्रेक्षक गॅलरीत 20 नगरसेवक बसू शकतात.

सभागृहात खुर्च्या लावून इतर नगरसेवकांची सोय केली जाऊ शकते. तर, सर्व अधिकारी सभागृहाबाहेर बसतील. त्यानुसार महापौर उषा ढोरे व सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सभागृहाची पाहणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.