Pimpri : नववर्षानिमित्त शहरात राबविले विशेष सुरक्षा अभियान

एमपीसी न्यूज – नवीन वर्षाचे स्वागत करत (Pimpri) असताना ‘जल्लोष नूतन वर्षासाठी प्रवास स्वतःच्या सुरक्षेसाठी’ हा अभिनव उपक्रम पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय – निगडी वाहतूक विभाग व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी व आसपासच्या परिसरात राबविण्यात आले. 31 डिसेंबर व 1 जानेवारी या दोन दिवशी हा उपक्रम राबविला गेला.

या उपक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे, पोलीस उप निरीक्षक आर म्हस्के, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती राज्य अध्यक्ष विजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपक्रमात सहभाग अर्चना घाळी, विजय मुनोत, सतीश देशमुख, गोपाळ बिरारी, बाबासाहेब घाळी, विशाल शेवाळे, अजय घाडी, सतीश मांडवे, राजेश बाबर, तेजस सापरिया, नितीन मांडवे, रामेश्वर गोहील, राहुल लुगडे, सुकेश येरूनकर, कपिल पवार, संजय थोरात, तेजस साकट, संदीप पोलकम, राजेंद्र कुंवर, उद्धव कुंभार, भरत उपाध्ये, ओंकार पाटील यांनी घेतला.

Pune Crime News : धक्कादायक! 100 रुपये दिले नाही म्हणून तरुणाचा मनगटापासून हातच छाटला

तरुणांमध्ये दुचाकी चालवत असताना रिफ्लेक्टर्स व हेल्मेट (Pimpri) का महत्त्वाचे? अपघातांचे वाढते प्रमाण, त्याबाबत घ्यावयाची काळजी अशी माहिती प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे एसपीओ व पोलीस कर्मचारी यांनी तरुणांना दिली. उपक्रमाचे संयोजन निगडी वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी लक्ष्मण कोल्हे, दीपक तांदळे, प्रिया पवार यांनी केले. यावेळी तरुणांनीही यामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या प्रसंगी रिफ्लेक्टर्सचे वाटप करून मिठाईही वाटण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.