Pimpri: रस्त्यावर थुंकणे, मास्कविना फिरणाऱ्यांवर आजपासून गुन्हे दाखल करणार-आयुक्त हर्डीकर

Pimpri: Spitting on streets and criminal cases will be filed against those walking without masks from today- Commissioner Shravan Hardikar जे नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे. उगचाच रस्त्यावर फिरणा-यांची संख्या खूप वाढली आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. ती संख्या कमी व्हायला पाहिजे. रस्त्यावर थुंकणारे, मास्कविना फिरणारे आणि लॉकडाऊन नियमांचा उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आजपासून गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील रुग्णसंख्या 4418 वर जाऊन पोहोचली आहे. अनलॉक दोनमध्ये नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.

त्या पार्श्वभूमीवर बोलताना आयुक्त हर्डीकर म्हणाले, रस्त्यावर थुंकणारे, मास्कविना फिरणारे आणि लॉकडाऊन नियमांचा उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस, महापालिका प्रशासन आणि इतर कर्मचा-यांच्या मदतीने कारवाई केली जाईल.

जे नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे. उगचाच रस्त्यावर फिरणा-यांची संख्या खूप वाढली आहे. ती संख्या कमी व्हायला पाहिजे.

चौका-चौकात रिकामटेकडे तरुण घोळका करुन थांबतात. नाहक गर्दी करतात. मोबाइल, व्हिडिओ बघत, गेम खेळत थांबलेले दिसतात. त्यांनी घरात थांबले पाहिजे. कारण त्यांच्यामार्फत प्रसार होत आहे.

नियमांचे जे पालन करणार नाहीत. या लोकांवर आजपासून सक्त कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य केले नाही. तर त्यांच्याविरोधात गुन्हे देखील दाखल होऊ शकतील. दंडात्मक कारवाई तर होईलच पण गुन्हेही दाखल केली जातील, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like