BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : एरोबिक्स डान्स व एरोबिक्स जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी हेवन संघाचे खेळाडू गोव्याला रवाना

एमपीसी न्यूज- फिटयुथ पेन इंडिया आयोजित 2 री राष्ट्रीय स्तरीय एरोबिक्स डान्स व एरोबिक्स जिमनॅस्टिक स्पर्धेचे आयोजन गोवा येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील हेवन स्पोर्टस क्लबचे खेळाडू गोव्याला रवाना झाले.

हेवन स्पोर्टस क्लबतर्फे 11 वर्ष वयोगटातील वैयक्तिक पुरूष गटात अद्वैत खांबेटे व वैयक्तिक महिला गटात परीजा क्षीरसागर सहभाग घेणार आहे. गेल्यावर्षी अद्वैत या स्पर्धेत 5 व्या स्थानावर होता तर परीजा हिची ही पहिलीच स्पर्धा असणार आहे. ही स्पर्धा 12 ते 14 जून दरम्यान पार पडणार आहे.

हेवनची पूर्व खेळाडू व प्रशिक्षक क्षितिजा राऊत प्रशिक्षक म्हणुन कार्य पहाणार आहे अशी माहिती संस्थेचे प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांनी दिली. चैतन्य कुलकर्णी, अलका तापकीर व समुहाने खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

.