Pimpri : ‘सियावर रामचंद्र की जय’च्या जयघोषाने श्रीरामनवमी भक्तिभावाने साजरी

एमपीसी न्यूज – “श्रीराम जय राम जय जय राम’चा जयघोष…मंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांच्या लागलेल्या रांगा… कीर्तन, पाळणा आणि त्यानंतर मिरवणूक… अशा भक्तिपूर्ण वातावरणात आज, शनिवारी पिंपरी चिंचवड शहरात श्रीराम नवमीच्या सण मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. रामजन्म संगीत सोहळा, शोभायात्रा, सामुदायिक रामरक्षा पठण अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

शहरातील श्रीराम मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. मंदिर परिसर भाविकांनी अक्षरश: गजबजून गेला होता. या सोहळ्यासाठी मध्यरात्रीपासून राम मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. धार्मिक विधी झाल्यानंतर पहाटे सहा वाजता राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पिंपरी, चिंचवड, भोसरी, संततुकारामनगर, रहाटणी येथील राम मंदिरात कीर्तन व श्रीराम गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी रामजन्म सोहळ्यानंतर काही मंदिरातून महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला.

  • निगडी येथील ओम साई राम ट्रस्ट व ओम साई द्वारकामाई प्रतिष्ठान यमुनानगर तर्फे श्री रामजन्म सोहळा आयोजित करण्यात आला. दुपारी बारा वाजता रामजन्म व महाआरती झाली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

श्रीराम मंदिरांमध्ये सत् सीता रामचंद्र की जय..,प्रभू रामचंद्र की जय.., बोल बजरंग बली की जय.., च्या जयघोष ही मंदिरातून करण्यात आला. श्रीराम जन्म सोहळ्यावेळी भाविकांनी केलेल्या गुलालाचे उधळणीमुळे फुलांचा व गुलालाचा सडा पडला होता. संपूर्ण मंदिर परिसरातील वातावरण राममय झाले होते.

  • प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. मंदिर परिसर भाविकांनी अक्षरश: गजबजून गेला होता. या सोहळ्यासाठी मध्यरात्रीपासून राम मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटेचे धार्मिक विधी झाल्यानंतर सकाळी सहा वाजता राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरात कीर्तन व श्रीराम गीतांच्या कार्यक्रमांचे पिंपरी, चिंचवड, भोसरी, संततुकारामनगर, रहाटणी याठिकाणी आयोजन करण्यात आले होते. शहरातील असणा-या राम मंदिरातून दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. काही ठिकाणी दर्शनानंतर भाविकांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला.

निगडी येथील ओम साई राम ट्रस्ट व ओम साई द्वारकामाई प्रतिष्ठान यमुनानगरतर्फे श्री रामजन्म सोहळा आयोजित करण्यात आला. दुपारी बारा वाजता रामजन्म व महाआरती झाली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

  • श्रीराम नवमी उत्सवाला प्रचाराची झालर
    श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम शहरात पार पडले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सध्या वेग आला आहे. रामनवमीच्या उत्सवाचे औचित्य साधून उमेदवारांनी मंदिर परिसरातील भाविकांच्या भेटीगाठी घेतल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.