-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri : महाविद्यालयीन तरुणावर भरदिवसा चाकूने वार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवरून जात असताना तरुणावर एकाने चाकूने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 27 जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली. याप्रकरणी दोन फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर दीपक गुप्ता (वय 18, रा. दर्गा वसाहत, गवळीवाडा, खडकी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य घाडगे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर संत तुकाराम नगर येथील डी. वाय पाटील महाविद्यालयात बी कॉमच्या प्रथम वर्षात शिकत आहे. 27 जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुटल्यानंतर फिर्यादी सागर आणि त्याचा मित्र गोविंद यादव असे दोघेजण दुचाकीवरून घराकडे जात होते. ते संत तुकाराम नगर येथील साईबाबा मंदिरासमोर आले असता आरोपी आदित्य याने सागरची दुचाकी अडवली. सागर दुचाकीवरून खाली उतरला असता आरोपीने सागरला मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करत चाकूने त्याच्यावर वार केले. यामध्ये सागर गंभीर जखमी झाला आहे. याबाबत त्याने दोन फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदविला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.