Pimpri : स्थायीची 17 कोटीच्या विकासकामांना मंजुरी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 17 कोटी 15 लाख 65 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत आज (मंगळवारी) मान्यता देण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या. प्रभाग क्र.12 मधील काळभोर नगर शाळा क्र.2/2 येथील सिमाभिंतीची उंची वाढविणे. पेव्हिंग ब्लॉक बसविणे व देखभालीची कामे करणेकामी येणा-या सुमारे 52 लाख 16  हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र.13 राहुलनगर व श्रमिकनगर मधील जुन्या जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणा-या सुमारे 50 लाख 87  हजार रुपयांच्या खर्चासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 5 मधील शास्त्रीचौक, जय महाराष्ट्र चौक, हुतात्मा चौक परिसरात मलवाहिनीची सुधारणा कामे करणेकामी येणा-या सुमारे 31 लाख 87  हजार रुपयांच्या खर्चास,  कासारवाडी, केशवनगर, हिराबाई लांडगे झोपडपट्टी व उर्वरित परिसरातील आवश्यक त्या ठिकाणी जलनि:सारण नलिकांमध्ये सुधारणा करणेकामी येणा-या सुमारे 33 लाख 19  हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

‘क’ प्रभागा अंतर्गत येणा-या जुन्या मलनि:सारण नलिका बदलणेकामी येणा-या सुमारे 31 लाख 92 हजार रुपयांच्या खर्चास,  महापालिकेच्या विकास योजना प्रस्तावानुसार संरक्षण विभागाकडून विविध ठिकाणच्या रस्ता रूंदीकरण व रस्त्याच्या जागा हस्तांतरीत करून घेणे करिता संरक्षण विभागास सुमारे दोन कोटी 65 लाख 48 हजार अशा 17 कोटी रुपयांच्या शहर विकास कामांना मंजुरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.