Pimpri : स्थायी समिती निवडणूक; शिवसेना युतीचा धर्म पाळणार का?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपने विलास मडिगेरी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे केंद्र, राज्यात सत्तेत असलेली आणि आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती झालेली शिवसेना स्थायी समिती निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करुन युतीचा धर्म पाळणार की बंडखोरांना साथ देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपने विलास मडिगेरी यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. तर, भाजपच्याच शीतल शिंदे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. शिंदे यांच्या अर्जावर सूचक म्हणून राष्ट्रवादीच्या गीता मंचरकर तर अनुमोदक म्हणून शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची स्वाक्षरी आहे. तिसरीकडे राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या निवडणुकीत अतिशय चुरस निर्माण झाली आहे.

शिवसेना-भाजपसोबत केंद्र आणि राज्यात सत्तेत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची मनापासून युती झाली आहे. दोन्ही पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांनी युतीचे स्वागत केले आहे. पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपने विलास मडिगेरी यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. तर, शीतल शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिवसेना गटनेते राहुल कलाटे युतीचा धर्म पाळणार की बंडखोरांना साथ देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.