Pimpri: स्थायी समितीची 85 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 85 कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

या कामांना दिली मंजुरी!
# वडमुखवाडी फाटा ते चोविसवाडी येथे कृषीखात्याकडील ताब्यात आलेल्या जागेवर रस्ता रूंदीकरण व नाल्याचे बांधकाम करणेकामी येणा-या सुमारे 20 कोटी 52 लाख 51 हजार, सांगवी किवळे रस्त्यावरील साई चौक ते पुनावळे चौक पर्यंतच्या रस्त्यावरील स्ट्रार्म वॉटर लाईन टाकणेकामी येणा-या सुमारे 15 कोटी 14 लाख 94 हजार रुपयांच्या खर्चासही, या महापालिकेच्या उद्यान विभागास तीन वर्ष कालावधीसाठी आवश्यक असणारी खेळणी पुरविणे व बसविणेकामी येणा-या सुमारे तीन कोटी 88 लाख रुपयांच्या खर्चास, कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्र टप्पा क्र. 2चे चालन देखभाल व दुरूस्ती करणेकामी येणा-या सुमारे दोन कोटी 26 लाख 65 हजार रुपयांच्या खर्चास, या जुन्या हॅरिस ब्रिजची दुरूस्ती करणेकामी येणा-या सुमारे दोन कोटी 85 लाख 61 हजार रुपये भूमकर चौक ते मनपा हद्दीपर्यंतच्या रूंदीकरण करणेकामी येणा-या सुमारे दोन कोटी चार लाख 48 हजार रुपयांच्या खर्चास,

इंद्रायणीनगर सेक्टर नं तीन येथील स्केटींग रिंगचे स्थापत्य, विद्युत व अनुषंगिक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे एक कोटी 93 लाख 37 हजार रुपयांच्या खर्चास, रहाटणी येथे ठिकठिकाणी स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 1 कोटी 24 लाख 52 हजार रुपयांच्या खर्चास, काळभोरनगर, मोहननगर येथील स्वच्छतागृहांचे नुतनीकरण करण्यासाठी कामे येणा-या सुमारे 97 लाख 39 हजार रुपयांच्या खर्चास, वडाचा मळा परिसरातील ताब्यात आलेला डी.पी. रस्ते विकसित करण्यात येत असून त्याठिकाणी विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 74 लाख 85 हजार रुपयांच्या खर्चास,

नाशिक फाटा ते वाकड या रस्स्तयावर गोविंद गार्डन चौक येथे सबवे बांधणे व विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 74 लाख 31 हजार रुपयांच्या खर्चास, आरोग्य विभागास आवश्यक साफसफाई साहित्य खरेदीकामी येणा-या सुमारे 64 लाख 92 हजार रुपयांच्या खर्चास, प्राधिकरणाचा उड्डणपुल ते टाटा मोटर्स कार प्लँन्ट रस्ता डांबरीकरण व चेंबर व्यवस्था करण्यासाठी येणा-या सुमारे 55 लाख 64 हजार रुपयांच्या खर्चास मोरवाडी परिसरातील रस्त्यांचे मजबूतीकरण,सुधारणा,नुतनीकरण, काँक्रिटीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे 45 लाख 79 हजार रुपयांच्या खर्चास, पीएमपीएमएलला सन 2017-18 मध्ये देय होणारी संचलनतूट समायोजीत करून उर्वरित संचलनतूट सुमारे 15 कोटी 84 लाख 85 हजार दोन समान हफ्त्यात अदा करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.