Pimpri: शिक्षण समितीला स्थायीचा दणका, समितीच्या आठ प्रस्तावांना ‘ब्रेक’; फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीला स्थायी समितीने दणका दिला आहे. शिक्षण समितीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप, डिलक्स क्लास रूम सुरू करणे, ग्रंथालये, विद्यार्थ्यांना स्काऊट ग्राऊंड गणवेश वाटप करणे, हाफ जॅकेट खरेदी, विद्यार्थ्यांना पौष्टीक आहार, पाण्यासाठी कॉपर वॉटर बॉटस आणि कौशल्य अभ्यासक्रम या आठही प्रस्तावांना स्थायी समितीने ब्रेक लावला आहे. प्रस्तान फेरसादर करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात देखील शिक्षण समितीचे प्रस्ताव फेरसादर करण्याचे आदेश स्थायीने दिले होते.

शिक्षण समितीच्या सदस्या निर्मला गायकवाड, रेखा दर्शले आणि शशिकांत कदम यांचे सदस्य प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आले होते. अंतिम मान्यतेसाठी स्थायी समितीकडे पाठविले होते. त्यामध्ये महापालिकेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत 12 उपक्रमशिल प्राथमिक शाळांमध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप करणे, विद्यार्थ्यांना अत्याधुनीक पद्धतीने तांत्रिक शिक्षण सुविधा उपलब्द होण्यासाठी डिजीटल क्लास रुम सुरू करावी.

या अंतर्गत डेव्हलप अँड प्रोव्हाईड ऑडिओ व व्हिज्युअल ई लर्निंग स्कूल कन्टेंट, सेटअप इन्स्टॉल्ड इन प्रीव्हिलीज्ड स्कूल, सेटअप मेंटेंन्ड अँड अपग्रेडेटड फॉर थ्री इअर्स, शिक्षकांना डिजीटल तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, शाळेच्या अभ्यासक्रमानुसार ई – लर्निंग सॉफ्टवेअर तयार करणे, स्कूल कम्पूटर लॅब तयार करणे आणि ई लर्निंग सॉफ्टवेअर मॅपिंग करणे.

शैक्षणीक विभागाच्या पुढील विषय शाळेविषयी आवड निर्माण होण्यासाठी स्काऊट ग्राऊंड गणवेश उपलब्ध करून देणे, खासगी शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे प्राथमिक शाळेतील पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी हाफ जाकेट खरेदी करणे, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मध्यान्त भोजनामध्ये पौष्टीक अहार म्हणून अंडी व एक फळ वाटप करणे, सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना कॉपर वॉटर बॉटल खेरदी करणे, शाळांमध्ये अद्यायावत ग्रंथालयाची उभारणी करणे.

याशिवाय शैक्षणीक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कौशल्याला वाव देण्यासाठी जीवन कौशल्य अभ्यासक्रम उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीत मंजूर करण्यात आले होते. अंतिम मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवले होते. तथापि, हे प्रस्ताव सविस्तर नाहीत. त्यामुळे फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

शैक्षणीक गुणवत्ते संदर्भात मांडण्यात आलेले विषयांचे प्रस्ताव सविस्तर पद्धतीने मांडण्यात आले नव्हते. त्यामुळे या विषयांचे फेरप्रस्ताव मागविण्यात आले आहे. फेरप्रस्ताव प्रप्त झाल्यानंतर या विषयांच्या मंजूरी संदर्भात निर्णय गेतला जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.