Pimpri : शेखर ओव्हाळ युवा मंचकडून राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा रद्द; पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करणार

एमपीसी न्यूज – शेखर ओव्हाळ युवा मंचतर्फे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करून कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत देण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परस्थिती निर्माण झाली आहे त्यांना अशावेळी मदत करणे माझे प्रथम कर्तव्य समजतो, अशी माहिती शेखर ओव्हाळ युवा मंचचे अध्यक्ष आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार शेखर ओव्हाळ यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व लोकनेते शरदचंद्र पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सर्व आजी-माजी नगरसेवक यांच्यासमवेत जाऊन ही रक्कम देण्यात येईल.

  • याबाबत शेखर ओव्हाळ म्हणाले की, नागरिकांच्या क्षणिक आनंदापेक्षा गरजवंतांचे आणि पुरग्रस्तांचे अश्रू पुसणे मला जास्त महत्वाचे वाटते. पुरग्रस्तांचा संसार उभा करण्याचा विचार मला जास्त आनंद देणारा आहे.

काही दिवसांपूर्वी शहरातील दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी परिसरातील पूरबाधितांना शेखर ओव्हाळ युवा मंचातर्फे जेवण तसेच ब्लॅंकेटचे वाटप केले होते. त्यामुळे अशा पूर परिस्थितीत त्यांचा सगळा संसार पाण्यात बुडाला असेल, त्यांच्यावर काय प्रसंग ओढावला असेल, याची जाणिव असल्यानेच मी हा मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. निसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या पश्चिममहारष्ट्रातील पूरग्रस्तांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, एवढीच प्रार्थना करतो, असे शेखर ओव्हाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.