-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून पोलिसांच्या कामाचे कौतुक

राज्य महिला अयोग्य अध्यक्षांनी घेतली पिंपरी आणि कसारसाई येथील पीडित कुटुंबियांची भेट

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी आणि कासारसाई येथे झालेल्या गंभीर घटनांचा तपास पोलीस करीत आहेत. पोलीस करीत असलेल्या तपासावर राज्य महिला आयोगाचे लक्ष आहे. असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. तसेच त्यांनी पोलीस करत असलेल्या कामाचे कौतुक केले.

पिंपरी आणि कासारसाई घटनांमधील कुटुंबीयांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी आज (शुक्रवारी) भेट घेतली. पीडित कुटुंबियांशी चर्चा करून संपूर्ण प्रकार रहाटकर यांनी जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात भेट घेतली. आयुक्तालयात झालेल्या चर्चेत अप्पर आयुक्तांकडून देखील पोलीस करत असलेल्या तपासाची स्थिती जाणून घेतली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

विजया रहाटकर म्हणाल्या, “विकृत मनोवृत्तीतून कासारसाई आणि पिंपरी मधील घटना घडल्या आहेत. याबाबत समाजातील सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कासारसाई येथील प्रकरण पोलिसांनी दाखल करून घेण्यास विलंब केला असल्याचे समजले. याबाबत पीडितेच्या कुटुंबियांशी चर्चा केली असता कुटुंबीयांनी पोलीस यंत्रणा सहकार्य करीत असल्याचे सांगितले”

पॉक्सो कायद्यात शासनाने महत्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार आता आरोपीला फाशीची देखील शिक्षा होण्याची तरतूद करण्यात आली आहे. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत दोषारोपपत्र सादर करून आरोपीला शिक्षा होणार आहे. त्यानंतर आरोपीने अपील केले तर त्या अपिलानंतर सहा महिन्यात सुनावणी करून शिक्षा सुनावणे बंधनकारक करण्यात आले आहे, असेही रहाटकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.