Pimpri : दुचाकीच्या डीक्कीतून 42 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – दुचाकीच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 15 मे रोजी रात्री नऊ वाजता दत्तनगर, चिंचवड येथे घडली. याबाबत 19 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश दादाभाऊ गावडे (वय 49, रा. रामनगर, चिंचवड) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गावडे यांनी त्यांची  मोपेड दुचाकी ( एमएच 14 / एफके 7717)  15 मे रोजी रात्री दत्तनगर येथील टिकाराम चौधरीच्या दुकानापुढे पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीची डिक्की उघडून त्यातून 41 हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 42 हजारांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.