Pimpri : पिंपरी भाटनगर परिसरात वाहनांवर दगडफेक, नागरिकांना मारहाण

एमपीसी न्यूज- पिंपरी भाटनगर परिसरात चार मद्यपी तरुणांनी दहशत पसरवत वाहनांच्या काचा फोडल्या तर नागरिकांना काठ्यांनी मारहाण केली. ही घटना आज, गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या टोळक्याने एका स्कॉर्पिओ गाडीची काच फोडली तर दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांना मारहाण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.