Pimpri: वैद्यकीय अधिका-याची वेतनवाढ रोखली; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची कारवाई

एमपीसी न्यूज – वरिष्ठांशी उद्धटपणे बोलणे आणि महिला वैद्यकीय अधिका-याला धमकी देणा-या वैद्यकीय अधिका-याची एक वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. तसेच यापुढे गैरवर्तन केल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली.

डॉ. विनायक पुरुषोत्तम पाटील अशी वेतनवाढ स्थगित केलेल्या वैद्यकीय अधिका-याचे नाव आहे.

  • डॉ. पाटील वैद्यकीय अधिकारी या गट ‘ब’च्या पदावर कार्यरत आहेत. डॉ. पाटील वायसीएमएच रुग्गालयाच्या मेडिसीन विभागामध्ये कार्यरत आहेत. रुग्णालीन सेवा अत्यावश्यक असून रुग्णालयाशी संबंधित प्रत्येक अधिकारी, कर्मचारी 24 तास बांधील आहेत. डॉ. पाटील हे बाह्यरुग्ण विभागामध्ये वारंवार अनुउपस्थित असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने त्याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी 1 मार्च 2016 रोजी समक्ष शहानिशा केली. त्यावेळी रुग्णांची रांग लागली होती. डॉ. पाटील, त्यांचे कोणतेही कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी तिथे उपस्थित नव्हते.

याबाबत डॉ . पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना उद्धटपणे उत्तरे दिली. वरिष्ठांचा अपमान करुन गैरवर्तन केले. तसेच महिला वैद्यकीय अधिकारी यांना धमकी देऊन आणि सेवेतून कमी करण्याबाबत भ्रमणध्वनीद्वारे संदेश पाठवून गैतवर्तन करुन कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे डॉ. पाटील यांची एक वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे.

  • या आदेशाची नोंद त्यांची सेवा पुस्तकात केली जाणार आहे. त्याचबरोबर यापुढे कोणत्याही स्वरुपाचे कार्यालयीन कामकाजामध्ये गैरवर्तन अथवा उद्धट स्वरुपाचे वर्तन केल्याचे निर्दशनास आल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.