Pimpri: शहरात सोमवारी मध्यरात्रीपासून 10 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन;  आयुक्त हर्डीकर यांची माहिती

Strict lockdown in the city for 10 days from midnight on Monday; Information of Commissioner Hardikar : कारखाने, दुकाने सर्वच बंद असणार आहे. केवळ दूध आणि मेडिकल दुकाने सुरू राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून ते 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या कालावधीत कारखाने, दुकाने सर्वच बंद असणार आहे. केवळ दूध आणि मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत. त्याबाबतचे सविस्तर आदेश लवकरच काढले जातील अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीकडून केली जात होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री, तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख वाढत आहे. रुग्णवाढीचे उच्चाक होत आहेत.

शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. मागील पाच दिवसात नवीन दोन हजार रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातच जुलैअखेरपर्यंत 10 हजार रुग्ण होण्याचा अंदाज आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वर्तविली आहे.

कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही शहरात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत. त्यामुळे  पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे.

सोमवारपासून म्हणजे 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे 10 दिवस लॉकडाउन असनार आहे. 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत कारखाने, दुकाने सर्वच बंद असणार आहे.

केवळ दूध आणि मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत.  लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या सहा हजार पार झाली आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.