Pimpri : “विद्यार्थी समरसता” साहित्य संमेलनाचे 5 फेब्रुवारी रोजी आयोजन

एमपीसी न्यूज – समरसता साहित्य परिषदेच्या वतीने 5 फेब्रुवारी 2020 रोजी एक दिवसीय अकरावे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. समरसता साहित्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांच्या अध्यक्षतेखाली अकरावे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हास्ते होणार आहे. याप्रसंगी महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरीचे प्राचार्य प्रा.डॉ. पांडुरंग गायकवाड, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. राजेंद्र कांकरिया आणि पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. गिरीश आफळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सकाळी 8.30 ला सुरु होणाऱ्या संमेलनात दिवसभर विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये डॉ. सीमा निकम यांचे ‘सोशल मीडिया – एक दुधारी शस्त्र’ या विषयावर व्याख्यान होणार आहे तसेच तीन पथनाट्ये सादर होणार असून, प्रश्नमंजुषा, विद्यार्थी कविसंमेलन आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.